Career Institute, Sindhudurg

"Nothing happens until something moves - PHYSICS"

Super 30 Career Institute, Sindhudurg

- BIOLOGY

Super 30 Career Institute, Sindhudurg

- CHEMISTRY

Super 30 Career Institute, Sindhudurg

- MATHS

Super 30 Career Institute, Sindhudurg

- COMPETITIVE EXAMS

Super 30 Career Institute, Sindhudurg

All about Competitive exams, JEE, NEET and MHT CET

Friday, July 31, 2020

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020
शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणांना यात मोठा वाव देण्यात आला आहे.21 व्या शतकातले हे पहिले शिक्षण धोरण असून 34 वर्ष जुन्या1986 च्या शिक्षणावरच्या राष्ट्रीय धोरणाची जागा नवे धोरण घेणार आहे.सर्वांना संधी, निःपक्षपात,दर्जा, परवडणारे आणि उत्तरदायित्व या स्तंभा वर याची उभारणी करण्यात आली आहे.2030 च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी याची सांगड घालण्यात आली आहे.शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अधिक समग्र,बहू शाखीय,21 व्या शतकाच्या गरजाना अनुरूप करत भारताचे चैतन्यशील प्रज्ञावंत समाज आणि जागतिक ज्ञान महासत्ता म्हणून परिवर्तन घडवण्याचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आगळ्या क्षमता पुढे आणण्याचा या धोरणाचा उद्देश आहे.

महत्वाचे मुद्दे:

शालेय शिक्षण

शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावर सार्वत्रिक प्रवेश संधी सुनिश्चित करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शालेय पूर्व ते माध्यमिक अशा सर्व स्तरावर शालेय शिक्षणाला सार्वत्रिक संधी सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे.पायाभूत सुविधा सहाय्य, शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कल्पक शिक्षण केंद्रे, विद्यार्थी आणि त्यांच्या अध्ययन स्तराचा मागोवा, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण पद्धतींसह शिक्षणाचे अनेक मार्ग सुलभ करणे, शाळांसमवेत समुपदेशक किंवा उत्तम प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्यांची सांगड, एनआयओएस आणि राज्यातल्या मुक्त शाळा याद्वारे 3, 5, आणि 8 व्या इयत्तेसाठी खुले शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम,प्रौढ साक्षरता आणि जीवन समृद्ध करणारे कार्यक्रम या मार्गाने हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत सुमारे 2 कोटी शाळाबाह्य मुले मुख्य प्रवाहात आणली जाणार आहेत.
नवा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक आराखड्यासह बालवयाच्या सुरवातीलाच काळजी आणि शिक्षण
बालवयाच्या सुरवातीलाच काळजी आणि शिक्षण यावर भर देत 10+2 या शालेय अभ्यासक्रम आकृती बंधाची जागा आता 5+3+3+4 अभ्यासक्रम आराखडा अनुक्रमे 3-8,8-11,11-14,14-18 वयोगटासाठी राहील. यामुळे 3-6 वर्ष हा आतापर्यंत समाविष्ट न झालेला वयोगट शालेय अभ्यासक्रमा अंतर्गत येईल, जगभरात हा वयोगट, बालकाच्या मानसिक जडणघडणीच्या विकासा साठी अतिशय महत्वाचा मानला जातो. नव्या पद्धतीत तीन वर्षे अंगणवाडी/ शाळापूर्व वर्गांसह 12 वर्ष शाळा राहणार आहे.
एनसीईआरटी, बालवयाच्या सुरवातीची काळजी आणि शिक्षण यासाठी 8 वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि शैक्षणिक आराखडा विकसित करणार आहे.अंगणवाडी आणि पूर्व शालेय सह विस्तृत आणि बळकट संस्थांच्या माध्यमातून ई सी सी ई देण्यात येईल.ई सी सी ई अभ्यासक्रमात प्रशिक्षित शिक्षक आणि आंगणवाडी कार्यकर्ते यासाठी असतील.मनुष्य बळ विकास,महिला आणि बाल विकास मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आदिवासी विकास मंत्रालय ई सी सी ई नियोजन आणि अंमलबजावणी करणार आहे.
पायाभूत साक्षरता आणि संख्या शिक्षण साध्य करणे
पायाभूत साक्षरता आणि संख्या शिक्षण ही शिक्षणाची पूर्व अट आहे हे जाणून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये एम एच आर डी कडून पायाभूत साक्षरता आणि संख्याशिक्षण राष्ट्रीय मिशन स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सर्व प्राथमिक शाळेत सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्या शिक्षण साध्य करण्यासाठी राज्ये अंमलबजावणी आराखडा तयार करतील.देशात राष्ट्रीय ग्रंथ प्रोत्साहन धोरण आखण्यात येईल.
शालेय अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा
21 व्या शतकाची प्रमुख कौशल्ये , आवश्यक शिक्षण आणि चिकित्सात्मक विचार वाढवण्यासाठी अभ्यासक्रम कमी करणे आणि अनुभवातून शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा शालेय अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या पद्धतीचा उद्देश असेल. विद्यार्थ्यांची लवचिकता आणि विषयांचे पर्याय वाढतील. कला आणि विज्ञान, अभ्यासक्रम आणि अवांतर उपक्रम, तसेच व्यावसायिक आणि शैक्षणिक शाखा यांच्यात कुठल्याही प्रकारचे कठोर विभाजन असणार नाही.
शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण 6 वी पासून सुरू होईल आणि त्यात इंटर्नशिपचा समावेश असेल.
एनसीईआरटी द्वारे एक नवीन आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय शालेय शिक्षण अभ्यासक्रम रूपरेषा -एनसीएफएसई 2020-21 विकसित केली जाईल.
बहुभाषिकता आणि भाषेची ताकद
या धोरणामध्ये किमान इयत्ता 5 वी पर्यंत आणि प्राधान्याने 8 वी आणि त्यानंतरही मातृभाषा / स्थानिक भाषा / प्रादेशिक भाषा हे शिकवण्याचे माध्यम असावे यावर भर देण्यात आला आहे. शालेय आणि उच्च शिक्षणाच्या सर्व स्तरांवर विद्यार्थ्यांना तीन-भाषांच्या सूत्रासह संस्कृतचाही एक पर्याय दिला जाईल. भारतातील इतर अभिजात भाषा आणि साहित्य देखील पर्याय म्हणून उपलब्ध असतील. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत इयत्ता 6--8 साठी ‘भारताच्या भाषा’ विषयावरील मजेदार प्रकल्प / उपक्रमात विद्यार्थी सहभागी होतील. माध्यमिक स्तरावर विविध परदेशी भाषांचा पर्याय देखील दिला जाईल. दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता वापरण्यासाठी भारतीय सांकेतिक भाषा (आयएसएल) संपूर्ण देशभरात प्रमाणित केली जाईल आणि राष्ट्रीय आणि राज्य अभ्यासक्रम सामुग्री विकसित केली जाईल. कुठल्याही विद्यार्थ्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही.
मूल्यांकन सुधारणा
एनईपी 2020 मध्ये सारांशात्मक मूल्यांकनाकडून नियमित आणि रचनात्मक मूल्यांकनाकडे वळण्याची कल्पना मांडली आहे जी अधिक योग्यता-आधारित आहे , शिक्षण आणि विकासाला उत्तेजन देणारी आहे आणि विश्लेषण, चिकित्सात्मक विचार प्रक्रिया आणि वैचारिक स्पष्टता या सारखी उच्च कौशल्ये तपासते. इयत्ता 3, 5 आणि 8 वी मध्ये सर्व विद्यार्थी शालेय परीक्षा देतील जी योग्य यंत्रणेद्वारे घेण्यात येईल. इयत्ता 10 आणि 12 वी साठी शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) परीक्षा सुरूच राहतील मात्र समग्र विकासाच्या उद्देशाने त्यांची पुनर्र्चना केली जाईल. दर्जा निश्चिती संस्था म्हणून पारख (समग्र विकासासाठी कामगिरी मूल्यांकन , आढावा आणि ज्ञानाचे विश्लेषण ) हे एक नवे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र स्थापन केले जाईल.
न्याय्य आणि सर्वसमावेशक शिक्षण
जन्माच्या वेळेची परिस्थिती किंवा अन्य पार्श्वभूमीमुळे कोणताही मुलगा शिकण्याची आणि उत्कृष्टतेची संधी गमावणार नाही हे एनईपी 2020 चे उद्दीष्ट आहे . लिंग, सामाजिक-सांस्कृतिक आणि भौगोलिक ओळख आणि अपंगत्व समाविष्ट असलेल्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित गटांवर (एसईडीजी) विशेष भर दिला जाईल. यामध्ये लिंग समावेश निधी आणि वंचित प्रदेश आणि गटांसाठी विशेष शैक्षणिक क्षेत्र स्थापन करण्याचा समावेश आहे. दिव्यांग मुले प्रशिक्षण , संसाधन केंद्रे, राहण्याची सुविधा , सहाय्यक उपकरणे, योग्य तंत्रज्ञान-आधारित साधने आणि त्यांच्या गरजांनुसार तयार करण्यात आलेल्या अन्य सहाय्यक साधनांच्या मदतीने पूर्व-प्राथमिक टप्प्यापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या नियमित शालेय शिक्षण प्रक्रियेत पूर्णपणे भाग घेण्यास सक्षम असतील. प्रत्येक राज्य / जिल्ह्यात कला-संबंधित, करिअरशी संबंधित आणि खेळाशी संबंधित उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी एक खास डे-टाइम बोर्डिंग स्कूल म्हणून "बाल भवन्स" स्थापन करायला प्रोत्साहन दिले जाईल. सामाजिक चेतना केंद्रे म्हणून मोफत शालेय पायाभूत सुविधा वापरता येतील.
मजबूत शिक्षक भरती आणि करिअर मार्ग
शिक्षकांची भरती सक्षम पारदर्शक प्रक्रियेद्वारे केली जाईल. बढती गुणवत्तेवर आधारित असेल ज्यामध्ये बहु-स्रोत नियमित कामगिरी मूल्यांकन आणि उपलब्ध प्रगतीचे मार्ग याद्वारे शैक्षणिक प्रशासक किंवा शिक्षक होता येईल. एनसीईआरटी, एससीईआरटी, शिक्षक आणि विविध पातळी व प्रदेशातील तज्ज्ञ संघटना यांच्याशी विचारविनिमय करून राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद 2022 पर्यंत शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके (एनपीएसटी) विकसित करेल.
Share:

Saturday, July 25, 2020

शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम

शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम

http://www.maa.ac.in/
Share:

Monday, January 13, 2020

सुपर करिअर संवाद - भाग ७

योग थेरेपी



बॅचलर ऑफ सायन्स इन योग सायन्स :

डिप्लोमा इन योग स्टडीज :

डिप्लोमा इन योग थेरेपी :


पत्ता-
६८, अशोक रोड, नियर गोले डाक खाना, न्यू दिल्ली-११०००१, दूरध्वनी- २३७३०४१७/१८, फॅक्स- २३७११६५७ मेल- mdniy@yahoo.co.inwww.yogamdniy.com
 बॅचरल ऑफ सायन्स इन योग अँड कॉन्शसनेस : 
 बॅचरल ऑफ सायन्स इन योग अँड कॉन्शसनेस : 
 मास्टर ऑफ सायन्स इन योग अँड कॉन्शसनेस : 
 बॅचरल ऑफ सायन्स इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स :
 मास्टर ऑफ फिलासॉफी इन योग थेरपी अँड कौन्सेिलग :
 डॉक्टरल ऑफ मेडिसिन इन योग अँड रिहॅबिलिटेशन :
 बॅचरल ऑफ सायन्स इन योग अँड मॅनेजमेंट :
 मास्टर ऑफ सायन्स इन योग अँड मॅनेजमेंट :
 मास्टर ऑफ फिलोसॉफी इन योग अँड मॅनेजमेंट :
 बॅचरल ऑफ आर्ट इन योग :
 डॉक्टरल डिग्री इन योग :
 बॅचरल ऑफ सायन्स इन योग :
 मास्टर ऑफ सायन्स इन योग :
 डिप्लोमा इन योगिक सायन्स :
 डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योग थेरपी :
 डिप्लोमा इन योग अँड नíस्ांग :
 पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरपी :
 पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरेपी फॉर डॉक्टर्स- 
 योग इन्स्ट्रक्टर कोर्स-
पत्ता-
स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था युनिव्हर्सिटी, वेबसाईट- www.svyasa.org दूरध्वनी- ०८०-२६६१२६६९ फॅक्स-२६६० ८६४५.

बॅचलर ऑफ योग टीचर : बॅचलर ऑफ नॅचरोपथी अँड योग
डिप्लोमा इन योग टीचर:
डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योग:
पत्ता- मानव भारती युनिव्हसिर्टी, लाड्डो, सुलतानपूर, सोलान, हिमाचल प्रदेश. १७३२२९, दूरध्वनी- ०१७९२-२६८२७९ मेल- manavbhartiuniversity@gmail.com
वेबसाईट- www.manavbhartiuniversity.edu.in
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग वुईथ अल्टरनेट थेरपी :
अर्ज व माहितीपत्रक ६६६.’ल्ल्रस्र्ी.ल्ली३ - पत्ता- रजिस्ट्रार, लक्ष्मीबाई इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, शक्ती नगर, रेस कोर्स रोड, ग्वाल्हेर- ४७४००२ दूरध्वनी- ०७५१-४०००९०६, ४०००९१७, फॅक्स- २३४०५५३, ¸û»F-idesagar@yahoo.com

डिप्लोमा इन योगा अँड मेडिटेशन :


पत्ता- डायरेक्टर हरिसिंघ गौर विश्वविद्यालय सागर ४७०००३, दूरध्वनी-०७५८२-२६५०५५ 
वेबसाईट- www.sagaruniversity.nic.in
मेल- idesagar@yahoo.com

डिप्लोमा इन योग एज्युकेशन :


अर्ज www.dauniv.ac.in. पत्ता: रजिस्ट्रार, डीएव्हीव्ही, आरएनटी मार्ग, इंदोर ४५२००१, दूरध्वनी- ०७३१-२५२७५३२, फॅक्स- २५२९१५४०, मेल- registrar.davv@dauniv.ac.in
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरपी :
पत्ता- जीवाजी युनिव्हर्सिटी ग्वाल्हेर. दूरध्वनी- ०७५१-२४४२७१२, फॅक्स-२३४१७६८, वेबसाईट : www.jiwaji.edu 
एम.ए.किंवा एम.एस्सी इन ह्युमन कॉन्शियसनेस अ‍ॅण्ड योगिक सायन्स- भोपाळ, बरकत्तुला विद्यापीठ 
पीएचडी इन योगिक सायन्स 
एम.फिल इन योगिक सायन्स 
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्ट्रेस मॅनेजमेंट 
सर्टिफीकेट इन योगिक सायन्स 
डिप्लोमा इन योगिक सायन्स 
एम.ए. किंवा एम.एस्सी. इन ह्युमन कॉन्शियसनेस अँड योगिक सायन्स 
अर्ज व माहितीपत्रक www.bubhpal.nic.in वर उपलब्ध. पत्ता : बरकत्तुला युनिव्हर्सिटी भोपाळ. दूरध्वनी : ०७५५-२४९१७०३ किंवा २४९१७०६, फॅक्स- २४९१७०३ किंवा २४९१७०७.

डिप्लोमा इन योग :


पत्ता : डीन, फॅकल्टी ऑफ डिस्टन्स एज्युकेशन, गुरुकुल कांग्री विश्वविद्यालय, हरिद्वार २४९४०४ (उत्तराखंड), दूरध्वनी- ०१३३४-२४९०१३, मेल- rgistrargkv@yahoo.co.in
वेबसाइट- www.gkvharidwar.org

योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम :


यशंवतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक- ४२२२२२ दूरध्वनी-०२५३- २२३१४७८, २२३०१०६, २२३०११८ फॅक्स- २२३१ ४७८. मेल- registrar@ycmou.digitaluniversity.ac, वेबसाईट- ycmou.digitaluniversity.ac

मॅनोनमानिएन सुंदारानार युनिव्हर्सिटी:
डिप्लोमा इन योग टीचर ट्रेनिंग:
डिप्लोमा इन योग अँड नॅचरोपथी:

पत्ता- मॅनोनमानिएन सुंदारानार युनिव्हर्सिटी, तिरुनेलवेली, तामीळनाडू आणि श्री साई इन्स्टिटय़ूट ऑफ टीचर्स अँड इंडस्ट्रियल ट्रेिनग, लेहरागागा- १४८०३१, संगरुर जिल्हा, पंजाब, दूरध्वनी- ०१६७-६२७२ ४९६, मेल- info@msussi.org वेबसाईट- www.msussi.org
Share:

Saturday, January 11, 2020

इ. ११वी विज्ञान प्रवेश प्रक्रिया - २०२०

सुपर ३० करिअर इन्स्टिट्यूट, ओरोस या संस्थेतील इ. ११वी विज्ञान स्टेट बोर्ड व स्पर्धात्मक परीक्षा प्रवेश प्रक्रिया २०२०-२१ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरणेंकरीता एक संदेश "info" खालील संपर्क क्रमांकावर मेसेज करा किंवा आमच्या जिल्हा प्रतिनिधींशी संपर्क साधा.

संपर्क: ७६६६३२७७९५ / ८८३०२९५२०८


Share:

सुपर करिअर संवाद - भाग ६

ज्वेलरी डिझाइन अँड टेक्नॉलॉजी


इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ज्वेलरी :

गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंटच्या सहकार्याने डिप्लोमा इन ज्वेलरी मॅनेजमेंट हा दीड वर्षांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे.


प्रोफेशनल प्रोग्रॅम इन ज्वेलरी डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी :
बेसिक प्रोग्रॅम इन ज्वेलरी डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी : 
कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम :

सर्टििफकेट इन ज्वेलरी कॉम्प्युटर एडेड टेक्नॉलॉजी, फौंडेशन कोर्स इन ज्वेलरी मॅन्युफॅक्चुिरग, बेसिक इन ज्वेलरी डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी- सर्टििफकेट इन जेमॉलॉजी, सर्टििफकेट इन डायमंड ग्रेिडग,
पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ज्वेलरी, मॉडर्न सेंटर, साने गुरुजी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई-४०००११, दूरध्वनी- ०२२-२६७४४३५१ इमेल- info@iij.net.in
वेबसाईट- www.iij.net.in


इंटरनॅशन जेमॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट :



ग्रॅज्युएट जेमॉलॉजिस्ट, डायमंड ग्रॅज्युएट,कलरस्टोन ग्रॅज्युएट, पॉलिश्ड डायमंड ग्रेिडग,कलर्डस्टोन आयडेन्टिफिकेशन कोर्स, रफ डायमंड ग्रेिडग, ज्वेलरी डिझाइन ग्रॅज्युएट,प्रोफेशनल सीएडी, ज्वेलरी डिझाइन) डायमंड असॉर्टमेन्ट अ‍ॅण्ड माऊन्टेड ज्वेलरी ग्रेिडग, रिटेल सेल्स डेव्हलपमेन्ट
पत्ता- स्कूल ऑफ जेमॉलॉजी, ४०४, मनी महाल, ११/२१, मॅथ्यू रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई-४००००४.
दूरध्वनी- ०२२- ४०३५२५१३
वेबसाइट- www.igiworldwide.com
ईमेल- indiaeducation@igiworldeide.com
अ‍ॅकॅडमी ऑफ ज्वेलरी डिझाइन :

या संस्थेचे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
त्त् प्रोफेशनल डिझायिनग कोर्स, ज्वेलरी मॅन्युफॅक्चुिरग, जेमॉलॉजी. कालावधी,डायमंड ग्रेिडग.
पत्ता- २०५, मनी महल, ११/१२, मॅथ्यू रोड, ऑपेरा हाऊस, मुंबई-४००००४, दूरध्वनी- ०२२- ६६३११५३३. 

जीआयए :


त्त् ग्रॅज्युएट जेमॉलॉजिस्ट डिप्लोमा, ग्रॅज्युएट कलर्ड डिप्लोमा, ग्रॅज्युएट डायमंड डिप्लोमा, अ‍ॅक्लिरेटेड गॅज्युएट डायमंड डिप्लोमा, अ‍ॅक्रिडेटेड ज्वेलरी प्रोफेशनल :
पत्ता- जीआयए, १० वा माळा, ट्रेड सेंटर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई-४०००५१, दूरध्वनी-०२२-४०८५१५००, वेबसाइट- www.giaindia.in

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ज्वेलरी डिझाइन अँड टेक्नॉलॉजी :


त्त् डिप्लोमा इन जेमॉलॉजी, डिप्लोमा इन अ‍ॅडव्हान्स्ड ज्वेलरी डिझाइन वुईथ कॅाम्प्युटर एडेड डिझाइन, डिप्लोमा इन ज्वेलरी मॅन्युफॅक्चिरग, सर्टििफकेट कोर्स इन बेसिक ज्वेलरी डिझाइन
पत्ता- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ज्वेलरी डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, डीआयटीई बििल्डग, नियर डीजेबी वॉटर पार्क, श्री माँ आनंदमयी मार्ग, ओखला, इंडस्ट्रिअल एरिया, फेज टू, न्यू दिल्ली-११००२०, दूरध्वनी-२६३८७९४१/ २६३८३५७५.
ईमेल- info@nijdt.in वेबसाइट- www.nijdt.in

जीडी गोयंका स्कूल ऑफ फॅशन डिझाइन :


या संस्थेने इटलीच्या पॉलिटेक्निको डाय मिलॅनो या संस्थेच्या सहकार्यानं डिझायिनग क्षेत्राशी विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
बॅचलर ऑफ सायन्स इन ज्वेलरी डिझाइन
संपर्क- जीडी गोयंका एज्युकेशनसिटी, सोहना गुरगांव रोड, सोहना, हरयाणा- १२२१०३, ईमेल- applydesign@gdgoenka.com www.gdgoenka.com

Share:

सुपर करिअर संवाद - भाग ५

फॅशन टेक्नालॉजी

नॅशनल इन्स्टिटय़ूूट ऑफ फॅशन टेक्नालॉजी :

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत चालविण्यात येणारे अभ्यासक्रम हे मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, गांधीनगर, हैद्राबाद, कानपूर, कांग्रा, कोलकाता, पाटणा, भोपाळ, रायबरेली, शिलाँग येथे शिकवले जातात.

बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझाइन :


मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, गांधीनगर, हैद्राबाद कानपूर, कांग्रा, कोलकोता, पाटणा, रायबरेली, शिलाँग येथे शिकवला जातो.

बॅचलर ऑफ डिझाइन इन लेदर डिझाइन :


नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, रायबरेली येथे शिकवला जातो.

बॅचलर ऑफ डिझाइन इन एक्सेसरी डिझाइन :


नवी दिल्ली, बंगळुरू, भोपाळ, गांधीनगर, हैद्राबाद कांग्रा, कोलकाता, रायबरेली, शिलाँग येथे शिकवला जातो.

बॅचलर ऑफ डिझाइन इन टेक्सटाइल डिझाइन :


मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, गांधीनगर, हैद्राबाद, कानपूर, कांग्रा, कोलकाता येथे शिकवला जातो.

बॅचलर ऑफ डिझाइन इन निटवेअर डिझाइन :


मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैद्राबाद, कानपूर, कोलकाता येथे शिकवला जातो.

बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन कम्युनिकेशन :


मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हेद्राबाद, कानपूर, कोलकाता येथे शिकवला जातो.

बॅचलर ऑफ फॅशन टेक्नोलॉजी इन अ‍ॅपेरल प्रॉडक्शन :


मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, बंगळूरू, गांधीनगर, हैद्राबाद, कानपूर, कांग्रा, कोलकाता आणि जोधपूर येथे शिकवला जातो. 
मुंबई केंद्राचा पत्ता : एनआयएफटी कॅम्पस, प्लॉट नंबर १५, सेक्टर नंबर ४, खारघर नवी मुंबई- ४१०२१०, दूरध्वनी-०२२-२७७४७००. वेबसाइट- www.nift.ac.in ई-मेल- nift.mumbai@nift.ac.in
Share:

सुपर करिअर संवाद - भाग ४

ब्युटी, हेल्थ अँड मॅनेजमेंट



जावेद हबीब प्रोफेशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेअर ड्रेसिंग :

इन्टेन्सिव्ह कोर्स ऑन हेअर- 
पत्ता : जावेद हबीब प्रोफेशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेअर ड्रेसिंग, कार्पोरेट ऑफिस, युनिट नं. ११-१४, लक्ष्मी प्लाझा बििल्डग नं. ९, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू िलक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-५३ दूरध्वनी- ०२२- ४०१०५४७० 
मेल- info@jawedhabib.co.in 

व्हीएलसीसी इन्स्टिटय़ूट ऑफ ब्युटी, हेल्थ अँड मॅनेजमेंट :

अभ्यासक्रम- डिप्लोमा इन कॉस्मेटॉलॉजी, डिप्लोमा इन ब्युटी कल्चर, डिप्लोमा इन हेअर डिझायनिंग, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन मेकअप- डिप्लोमा इन डायटेटिक्स, हेल्थ अ‍ॅण्ड न्युट्रिशन, डिप्लोमा इन न्यूट्रिशन अ‍ॅण्ड हेल्थ एज्युकेशन, 
पत्ता : व्हीएलसीसी इन्स्टिटय़ूट ऑफ ब्युटी, हेल्थ अँड मॅनेजमेंट, फर्स्ट फ्लोअर, १०१- १०२ श्रीकृष्ण को-ऑप. हासिंग सोसायटी नं. ३, कांदिवली पश्चिम, मुंबई. दूरध्वनी- ०२२ ३२१९८२००, वेबसाइट : www.vlccinstitute.com ई-मेल : info@vlccinstitue.com
नलिनी अँड यास्मिन एज्युकेशन :
अभ्यासक्रम : हेअर ब्रश- हेअर रिफ्रेशर कोर्स- बाब्रेिरग- प्रोफेशनल मेकअप अँड हेअर स्टायिलग- पर्सनल ग्रुिमग- पर्सनल मेकअप अँड हेअर स्टायिलग- ब्युटी बेसिक्स- बॉडी ट्रिटमेंट अँड मसाज-
पत्ता- भोलेनाथ प्लाझा, सीटीएस १२३८, गुरु नानक रोड, बांद्रा तलावाजवळ, वांद्रे- पश्चिम, मुंबई- ४०००५०, दूरध्वनी-०२२-२६४२२०८४, मेल- education@nalini.in वेबसाईट- www.nalini.in


लॅक्मे अकादमी :

या संस्थेनं केस आणि चेहऱ्याचं सौंदर्य या विषयांवर पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- फौंडेशन इन स्किन केअर- , फौंडेशन इन हँड अँड फीट केअर- , फौंडेशन इन मेक अप- , फौंडेशन इन हेअर कट अँड स्टायिलग, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन एस्थेटिक्स . या अभ्यासक्रमात त्वचाशास्त्र, फेशिएल, प्रॉडक्ट केमेस्ट्री, नेल प्रॉडक्टस् अँड टेक्निक, बॅक्टेरिआलॉजी अँड सॅनिटेशन, फेशिएल अनाटॉमी अँड फिचर्स, वेगवेगळया समारंभानुसार मेकअप, यूझ ऑफ लॅटेस्ट स्किन केअर इक्विपमेंट या विषयांचा समावेश आहे. अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा हेअर. या अभ्यासक्रमात हेअर कलर, स्ट्रेन्दिनग, अ‍ॅडव्हान्स्ड हेअर कट्स, फॅशनेबल हेअर स्टायिलग टेक्निक्स या विषयांचा समावेश आहे. वेबसाईट- www.lakmetrainigacademy.com

ब्युटिक :

या संस्थेनं पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- फूल प्रोफेशनल डिप्लोमा ऑफ ब्युटी थेरेपी अँड हेअर ड्रेसिंग-. सेमी प्रोफेशनल डिप्लोमा ऑफ ब्युटी थेरेपी अँड हेअर ड्रेसिंग- . पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ब्युटी थेरेपी अँड हेअर ड्रेसिंग- ब्युटी थेरेपी- बॉडी थेरेपी-. अरोमा थेरेपी. नववधू मेक अप वर्कशॉप- अ‍ॅडव्हान्स्ड हेअर कट वर्कशॉप-, डिप्लोमा इन अरोमा थेरेपी-, डिप्लोमा इन लिम्फॅटिक ड्रेनेज मसाज-, डिप्लोमा इन रिफ्लेक्सोलॉजी- डिप्लोमा इन स्पोर्टस मसाज थेरेपी-, ब्युटिक स्पा डिप्लोमा-
पत्ता- ब्युटिक इन्स्टिटय़ूट ऑफ ब्युटी थेरेपी अँड हेअर ड्रेसिंग, मोगल लेन, माहीम मुंबई. मेल- mayabutic@gmail.com

इंडो-कॅनेडियन नॅशनल अकादमी :

या संस्थेनं पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- डिप्लोमा इन हेअर स्टायलिस्ट, डिप्लोमा इन एस्थेटिशिएन, सर्टििफकेट इन लेसर हेअर रिव्होवल, सर्टििफकेट इन मेक अप आर्टस्टि, नेल टेक्निशिएन, सर्टििफकेट इन मेडिकल एस्थेटिशिएन, कॉस्मेटालॉजी, स्पा थेरेपिस्ट, हाय टेक सर्टििफकेट कोर्स इन वेट मॅनेजमेंट, हाय टेक सर्टििफकेट कोर्स इन डायटिक्स अँड न्युट्रिशन, हाय टेक सर्टििफकेट कोर्स इन पर्मनंट मेकअप, हाय टेक सर्टििफकेट कोर्स इन बोटोक्स अँड फिलर्स- या अभ्यासक्रमासाठी आवश्यक अर्हता- एमबीबीएस.
पत्ता- इंडो-कॅनेडियन नॅशनल अकादमी, ३३, ३४ काíतक कॉम्प्लेक्स, न्यू िलक रोड, अंधेरी- पश्चिम, मुंबई. दूरध्वनी- ०२२ २६७३३३८६ वेबसाईट- www.icna.in

क्लॉरा- इंटरनॅशनल :

अभ्यासक्रम : हेअर कटस्, रिबॉिडग, कलिरग, हेअर ट्रीटमेंटस्, स्पेशलाईज्ड स्कीन ट्रीटमेंट, बॉडी मसाज-
पत्ता- राज कुटिर, तिसरा रस्ता, खार- पश्चिम, मुंबई-५२. दूरध्वनी- ०२२- २६०४१९९६ वेबसाईट- www.clara.co.in

एमइटी :

ट्रायकॉलॉजी या केशरोपण करणाऱ्या शास्त्राचे प्रशिक्षण देणारा पदवी आणि पदविका अभ्यासक्रम एमईटी इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रायकॉलॉजीमार्फत सुरू करण्यात आला आहे.
पत्ता- एमईटी-आरआयसीएचएफईईएल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी, एमईटी कॉम्प्लेक्स, बांद्रा रिक्लेमेशन. मुंबई- ५०. दूरध्वनी- ०२२-२६४४००९६, वेबसाईट- www.met.edu

एनरिच सलून अँड ब्युटी अकादमी :

अभ्यासक्रम- डिप्लोमा इन हेअर ड्रेसिंग- डिप्लोमा इन बेसिक ब्युटी- डिप्लोमा इन अ‍ॅडव्हान्स्ड ब्युटी- सर्टििफकेट इन सलून मॅनेजमेंट- मेक अप कोर्स- अ‍ॅडव्हान्स्ड हेअर कोर्स- अ‍ॅडव्हान्स्ड कटिंग एॅड कलरिग- मेन्स कटिंग 
पत्ता- एनरिच सलून अँड ब्युटी अकादमी, जी १/१२ शेरेटन क्लासिक, छतरसिंघ कॉलनी, अंधेरी कुर्ला रोड चकाला, अंधेरी ईस्ट, मुंबई- ४०००९३. दूरध्वनी- ०२२- ४०७३८०००,
ईमेल- education@enrichsalon.com,
वेबसाईट- www.enrichsalon.com

Share:

सुपर करिअर संवाद - भाग ३

डिझाइन क्षेत्रातील पर्याय


नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझाइन:

पदविका अभ्यासक्रम :
या अभ्यासक्रमांतर्गत पुढील तीन शाखांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.
इंडस्ट्रियल डिझाइन (प्रॉडक्ट / फíनचर / इंटरेरियर डिझाइन, सेरॅमिक अ‍ॅण्ड ग्लास डिझाइन), 
टेक्सटाइल अँड अ‍ॅपेरल
मीडिया डिझाइन (ग्रॉफिक/ एॅनिमेशन/ फिल्म अँड व्हीडियो कम्युनिकेशन/ एक्झिबिशन)

पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम :
हे अभ्यासक्रम १४ विद्याशाखांमध्ये करता येतात. 
प्रॉडक्ट डिझाइन, 
फर्निचर अँड इंटरेरियर डिझाइन, 
सिरॅमिक अँड ग्लास डिझाइन, 
टॉय डिझाइन अँड डेव्हलपमेंट,
टेक्स्टाइल डिझाइन, 
अ‍ॅपेरल डिझाइन अँड र्मकडायजिंग, 
लाइफ स्टाइल एॅक्सेसरी डिझाइन, 
ग्राफिक डिझाइन, 
अ‍ॅनिमेशन फिल्म डिझाइन, 
फिल्म अँड व्हीडियो कम्युनिकेशन, 
न्यू मीडिया डिझाइन, 
सॉफ्टवेअर अँड युझर इंटरफेस डिझाइन, 
इन्फम्रेशन अँड डिजिटल डिझाइन, 
स्ट्रॅटेजिक डिझाइन मॅनेजमेंट, 
डिझाइन फॉर रिटेल एक्सपिरिअन्स, 
डिझाइन फॉर डिजिटल एक्सपिरिअन्स- 
पत्ता : एनआयडी, पालडी, अहमदाबाद- ३८०००७ गुजरात 
वेबसाइट : www.nid.edu दूरध्वनी- ०७९-२६६२ ३६९२/ २६६२ ३४६२ फॅक्स- २६६२ ११६७

*एमआयटी इन्स्टिटयूट ऑफ डिझाइन अभ्यासक्रम:*


ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्रॉडक्ट डिझाइन, 
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सपोर्टेशन डिझाइन
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटेरिअर स्पेस अँड इक्विपमेंट डिझाइन
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिटेल अँड एक्झिबिशन डिझाइन
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ग्रॉफिक्स डिझाइन
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅनिमेशन फिल्म डिझाइन 
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फिल्म अँड व्हीडियो डिझाइन
ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॅशन डिझाइन. 
डिझाइन अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टची नॉर्थ ऊंब्रिया युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने बॅचलर ऑफ आर्ट इन थ्री डी डिझाइन, 
बॅचलर ऑफ आर्ट इन ग्रॅफिक डिझाइन, 
बॅचलर ऑफ आर्ट इन मोशन ग्रॅफिक अँड अ‍ॅनिमेशन, 
बॅचलर ऑफ आर्ट इन ट्रान्स्पोर्टेशन डिझाइन आणि बॅचलर ऑफ आर्ट इन इंडस्ट्री डिझाइन, 
स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ डुंडीच्या सहकार्याने बॅचलर ऑफ आर्ट इन अ‍ॅनिमेशन डिझाइन, 
मिडलसेक्स युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने बॅचलर ऑफ आर्ट इन आणि 
एॅबरटे युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने बॅचलर ऑफ आर्ट इन कॉम्पुटर आर्ट फॉर गेमिंग हे अभ्यासक्रमही या संस्थेने सुरू केले आहेत.
पत्ता- एमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, राजबाग, लोनी कालभोर, हडपसरच्या बाजूला. पुणे- ४१२२०१ दूरध्वनी - ०२०-३०६९३६९५ मेल - admissions@mit.edu.in वेबसाइट www.mitid.edu.in
० बॅचलर ऑफ आर्ट (ऑनर्स) इन फॅशन :
www.ucreative.ac.in
Share:

सुपर करिअर संवाद - भाग २

अ‍ॅनिमेशन आणि मल्टिमीडिया

डिप्लोमा इन अ‍ॅनिमेशन फॉर गेम :
 हा अभ्यासक्रम पुण्यातील सिमलेस एज्युकेशन अ‍ॅकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने सुरू केला आहे. त्यासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर थ्री डी एनिमेटर,थ्री डी मॉडय़ुलर, लेव्हल डिझायनर, गेम ऑर्टस्टि टू-डी, रोटो ऑर्टस्टि, डी पेन्ट ऑर्टस्टि, मॉडेिलग ऑर्टस्टि, कॅरेक्टर अ‍ॅनिमेटर यासारख्या करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
पत्ता- सिमलेस एज्युकेशन अ‍ॅकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर- १७, स्ट्रीट नंबर- १०६ ए/१, हॉटेल सहाराजवळ, सेनापती बापट रोड, पुणे- ४११०१६.
दूरध्वनी-०२०-६६४३१९००.
वेबसाइट- www.seamedu.com,
ई-मेल - info@seamedu.com

बॅचलर ऑफ मल्टिमीडिया डिझाइन :

रॅफेल्स डिझाइन इंटरनॅशनल या संस्थेने मुंबईत बॅचरल ऑफ मल्टिमीडिया डिझाइन हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. पत्ता- हाय लाइफ, सेकंड फ्लोअर, फिरोजशहा मेहता रोड, सांताक्रुज (पश्चिम), मुंबई-४०००५४. दूरध्वनी- ०२२-६५७२६७११.
वेबसाइट- www.rafflesadmin.com

बॅचलर ऑफ सायन्स इन मल्टिमीडिया :

फ्रेमबॉक्स अ‍ॅनिमेशन अ‍ॅण्ड व्हिज्युअल इफेक्ट्स या संस्थेने बॅचलर ऑफ सायन्स इन मल्टिमीडिया हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. डिजिटल फिल्म मेकर बनण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. पत्ता-१०१-१०८, फर्स्ट फ्लोअर शॉपर्स पॉइन्ट, एस. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५९, दूरध्वनी- ०२२-६६७५३२०३, वेबसाइट- www.frameboxx.in, ई-मेल- info@framebxx.in

ग्राफिक डिझाइन प्रोग्राम :

डब्ल्यूएलसीआय स्कूल ऑफ डिझाइन या संस्थेने ग्राफिक डिझाइन प्रोग्राम हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. पत्ता- महालक्ष्मी, सिल्क मिल्स, मथुरादास मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग लोअर, परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३. दूरध्वनी- ०२२-४०५७१९१९. 
वेबसाइट- www.wlcidesign.in 
ई-मेल - enquire@wlci.in

रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने डिजिटल मीडिया क्षेत्राला उपयुक्त ठरू शकतील असे विविध अभ्यासक्रम अ‍ॅनिमेशन इन्फोन्टेमेन्ट अ‍ॅण्ड मीडिया स्कूल या संस्थेच्या सहकार्याने सुरू केले आहेत. रिलायन्सचे हे विविध अभ्यासक्रम अ‍ॅनिमेशनमधील करिअरसाठी उपयुक्त ठरू शकतात. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-

अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन अ‍ॅनिमेशन फिल्म मेकिंग-थ्री डी प्रोसेस :

या अभ्यासक्रमात प्री-प्रॉडक्शन, फिल्म मेकिंग फाऊण्डेशन, अडॉब फोटोशॉप, माया फाऊण्डेशन, माया अ‍ॅडव्हान्स्ड, अडॉब आफ्टर इफेक्ट्स, आयऑन फ्युजन, अडॉब प्रीमिअर या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

डिप्लोमा इन प्री प्रॉडक्शन :


अ‍ॅनिमेशनपटांच्या पटकथा ते निर्मितीच्या पूर्व तयारीचा हा अभ्यासक्रम आहे.

अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन थ्री डी एनिमेशन स्पेशलायझेशन

अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन डिजिटल टू डी :

या अभ्यासक्रमात अडॉब फोटोशॉप, टू डी ट्रॅडिशनल, फ्लॅश/ हार्मनी, अडॉब आफ्टर इफेक्ट्स, न्यूक,अडॉब प्रीमिअर, प्री प्रॉडक्शन, फिल्म मेकिंग फाऊण्डेशन आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन व्हिज्युअल इफेक्ट्स फिल्म मेकिंग :

 सर्टििफीकेशन प्रोग्रॅम इन व्हिज्युअल इफेक्ट्स :
 मास्टर सर्टििफीकेशन इन माया मास्टर :
या अभ्यासक्रमात अडॉब फोटोशॉप, माया फाऊण्डेशन, माया अ‍ॅडव्हान्स्ड या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. अ‍ॅनिमेशन चित्रपटांना उपयुक्त ठरेल अशी प्रकाशयोजना, नेपथ्य, वस्त्रप्रावरणे, पात्रांचे व्यक्तिमत्त्व रेखांकन आदी बाबी या अभ्यासक्रमात शिकवल्या जातात.

सर्टििफीकेशन प्रोग्रॅम इन पोस्ट प्रॉडक्शन :


या अभ्यासक्रमात (अ‍ॅनिमेशन) कथाकथानाचे मूलभूत सिद्धांत, चित्रपट आणि संपादन, चित्रपटांशी निगडित छायाचित्रण कलाचे मूलभूत सिद्धांत, संपादन प्रक्रिया यासारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

सर्टििफीकेशन प्रोग्रॅम इन फ्लॅश अ‍ॅण्ड हार्मनी :


या अभ्यासक्रमात अ‍ॅनिमेटेड पात्रांच्या व्यक्तिमत्त्वांना जिवंतपणा देणारे तंत्रकौशल्य शिकवलं जाते. 
ई-मेल- enquiry@bigaims.in
mum.and@relianceaims.com
वेबसाइट- www.bigaims.in
Share:

Sunday, January 5, 2020

सुपर करिअर संवाद - भाग १

विज्ञान शाखेतील अभ्यासक्रम


  • बीएसस्सी (भौतिकशास्त्र)
  • बीएसस्सी (रसायनशास्त्र)
  • बीएसस्सी (वनस्पतीशास्त्र)
  • बीएसस्सी (प्राणीशास्त्र)
  • बीएसस्सी (संगणक)
  • बीएसस्सी (गणित)
  • बीएसस्सी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित)
  • बीएसस्सी (वनशास्त्र)
  • बीएसस्सी (आहारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञ)
  • बीएसस्सी (गृह विज्ञान)
  • बीएसस्सी (कृषी विज्ञान)
  • बीएसस्सी (उद्यानविद्या)
  • बीएसस्सी (रेशीम उत्पादन)
  • बीएसस्सी (समुद्रशास्त्र)
  • बीएसस्सी (मानववंशशास्त्र)
  • बीएसस्सी (न्यायवैद्यकशात्स्र)
  • बीएसस्सी (आहार)
  • बीएसस्सी (डेअरी तंत्रज्ञान)
  • बीएसस्सी (हॉटेल व्यवस्थापन)
  • बीएसस्सी (फॅशन डिझाईन)
  • बीएसस्सी (मल्टिमीडिया)
  • बीएसस्सी (थ्रीडी अॅनिमेशन)

वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रम


  • सनदी लेखापाल
  • मूल्य व्यवस्थापन
  • सीएस (कंपनी सचिव)
  • बी. कॉम (कर आणि कर प्रक्रिया)
  • बी. कॉम (प्रवास आणि पर्यटन)
  • बी. कॉम (बँक व्यवस्थापन)
  • बी. कॉम
  • बी.बी.ए
  • बी.बी.एम
  • आर्थिक व्यवस्थापन

इतर अभ्यासक्रम कला शाखा


  • जाहिरात
  • अर्थशास्त्र
  • ललित कला
  • परदेशी भाषा
  • इंटेरिअर डिझायनर
  • पत्रकारिता
  • ग्रंथशास्त्र
  • शारीरिक शिक्षण
  • राज्यशास्त्र
  • मानसशास्त्र
  • समाजसेवा
  • समाजशास्त्र

व्यवस्थापन संबंधी अभ्यासक्रम


  • व्यवसाय व्यवस्थापन
  • बँक व्यवस्थापन
  • इव्हेंट मॅनेजमेंट
  • रुग्णालय व्यवस्थापन
  • मानव संसाधन व्यवस्थापन
  • तर्कशास्त्र व्यवस्थापन

कायदेविषयक अभ्यासक्रम


  • एलएलबी
  • बीए. एलएलबी

वैद्यकीय अभ्यासक्रम


  • एमबीबीएस
  • बीएएमएस (आयुर्वेद)
  • बीएचएमएस (होमिओपॅथी)
  • बीडीएस

पॅरामेडिकल अभ्यासक्रम


  • नर्सिंग
  • डी.फार्म
  • बी.फार्म
  • भूल तंत्र
  • कार्डियाक केअर
  • मेडिकल लॅब तंत्रज्ञ
  • एक्स रे तंत्रज्ञ
  • रेडिओथेरपी तंत्रज्ञ
  • रिहाबिलिटेशन थेरपी

अभियांत्रिकी अभ्यासक्रम


  • बी.टेक अभियांत्रिकी
  • पेट्रो रसायन अभियांत्रिकी
  • पेट्रोलियम अभियांत्रिकी
  • स्थापत्य अभियांत्रिकी
  • यांत्रिक अभियांत्रिकी
  • वैमानिक अभियांत्रिकी
  • एरोस्पेस अभियांत्रिकी
  • कृषी अभियांत्रिकी
  • ऑटोमोबाईल अभियांत्रिकी
  • सागरी अभियांत्रिकी
  • खनन अभियांत्रिकी
  • कापड अभियांत्रिकी

तंत्रनिकेतन अभ्यासक्रम


  • स्थापत्य अभियांत्रिकी
  • यांत्रिक अभियांत्रिकी
  • ऑटोमोबाईल अभियांत्रिकी
  • संगणकशास्त्र अभियांत्रिकी
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी
  • विद्युत अभियांत्रिकी

असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातील आपला कल आणि आवड यानुसार अभ्यासक्रम निवडावा. तसेच यासंबंधी प्रशिक्षण संस्थांची निवड करतानाही विशेष काळजी घ्यावी. चला तर मग आपल्या करिअरचा मार्ग निश्चित करा आणि यशस्वी वाटचाल करा.
अधिक माहितीकरिता आमच्या नजीकच्या शाखेत आजच भेट द्या. 
संपर्कासाठी: 
प्रचीती: ९१५८०८१९५० / ९३७३१८३५४६
अजय : ८८८८१२४५४२ 
Share:

Followers

"Nothing happens until something moves"

"Nothing happens until something moves"
PHYSICS

"Concern with natural world and humanities"

"Concern with natural world and humanities"
BIOLOGY

"Multiplies your opportunities"

"Multiplies your opportunities"
MATHS

"Dedicated to results"

"Dedicated to results"
CHEMISTRY

Pages

Super 30

My photo
Sindhudurg, Maharashtra, India

Featured post

शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता इ. 11वी प्रवेश प्रक्रीया सुरु

 सर्व विद्यार्थी तथा पालक यांस संबोधित करण्यात येते की इ. 11वी प्रवेश प्रक्रीया शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षाकरीता सुरु झाली असून, सदर प्रव...

Search This Blog

Popular Posts