शैक्षणिक दृष्टीकोनांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या विविध अंगीकृत कलागुणांना वाव मिळावा, तसेच या कलागुणांची सर्वांस जाण व्हावी, याकरिता दि. ३१/१२/२०१९ रोजी सुपर ३० चा "फन विथ सुपर ३०" हा कार्यक्रम पार पडला.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सुपर ३० ने आपले पदार्पण नवीन जागेत केले. सदर जागा हि गोविंद सुपर मार्केट, ओरोस येथे असून या वास्तूत भव्य वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वाचनालय, संगणक कक्ष, इ. चा समावेश करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले नेहमीच प्रगती पथावर राहतील हा एकच ध्यास मनाशी घेऊन हि संस्था शैक्षणिक उपक्रमांत आपले योगदान देत आहे.
सदर "फन विथ सुपर ३०" या कार्यक्रमाला सौ. सुप्रिया वालावलकर यांनी प्रमुख उपस्थिती दाखवली. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत असताना त्या म्हणाल्या कि, "भविष्यकाळ हा पूर्णतः स्पर्धात्मक परीक्षांवर अवलंबून असून आपण अधिकाधिक स्पर्धात्मक परीक्षांची माहिती घेऊन त्या परीक्षांमध्ये अव्वल स्थान प्राप्त करणे गरजेचे आहे."
सुपर ३० च्या विविध उपक्रमांस त्यांनी शुभेच्छा दिल्या.