Career Institute, Sindhudurg

"Nothing happens until something moves - PHYSICS"

Super 30 Career Institute, Sindhudurg

- BIOLOGY

Super 30 Career Institute, Sindhudurg

- CHEMISTRY

Super 30 Career Institute, Sindhudurg

- MATHS

Super 30 Career Institute, Sindhudurg

- COMPETITIVE EXAMS

Super 30 Career Institute, Sindhudurg

All about Competitive exams, JEE, NEET and MHT CET

Tuesday, December 31, 2019

दि. ३१/१२/२०१९ रोजी "फन विथ सुपर ३०"

शैक्षणिक दृष्टीकोनांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या विविध अंगीकृत कलागुणांना वाव मिळावा, तसेच या कलागुणांची सर्वांस जाण व्हावी, याकरिता दि. ३१/१२/२०१९ रोजी सुपर ३० चा "फन विथ सुपर ३०" हा कार्यक्रम पार पडला.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सुपर ३० ने आपले पदार्पण नवीन जागेत केले. सदर जागा हि गोविंद सुपर मार्केट, ओरोस येथे असून या वास्तूत भव्य वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वाचनालय, संगणक कक्ष, इ. चा समावेश करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले नेहमीच प्रगती पथावर राहतील हा एकच ध्यास मनाशी घेऊन हि संस्था शैक्षणिक उपक्रमांत आपले योगदान देत आहे.
सदर "फन विथ सुपर ३०" या कार्यक्रमाला सौ. सुप्रिया वालावलकर यांनी प्रमुख उपस्थिती दाखवली. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत असताना त्या म्हणाल्या कि, "भविष्यकाळ हा पूर्णतः स्पर्धात्मक परीक्षांवर अवलंबून असून आपण अधिकाधिक स्पर्धात्मक परीक्षांची माहिती घेऊन त्या परीक्षांमध्ये अव्वल स्थान प्राप्त करणे गरजेचे आहे."
सुपर ३० च्या विविध उपक्रमांस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
Share:

Tuesday, December 24, 2019

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (युजी) NEET - 2020

राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाचा २०१९ चा कायदा राष्ट्रपतींनी ८ ऑगस्ट २०१९ ला मंजूर केल्यानंतर, राष्ट्रीय वौद्यकिय आयोगातील कलम -१४ नुसार एम.बी.बी.एस. अभ्यासक्रम ए.आय.आय.एम.एस.दिल्ली जे.आय.पी.एम.ई.आर. आणि इतर कोणत्याही कायद्या नुसार संचालित होणारया सर्व वैद्य किय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक समान राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET - 2020) घेण्यात येईल.

सदर परीक्षेची तारीख ३ मे २०२० अशी असून परीक्षेची आवेदन पत्रे भरण्याची अंतिम तारीख आहे ३१ डिसेंबर २०१९.
अधिक माहितीकरिता खालील लिंकवर क्लिक करा.

मराठी मध्ये जाणून घेण्यासाठी:
https://ntaneet.nic.in/ntaneet/ShowPdf.aspx?Type=1F7D662EC0F41DE2013706728E830CBF545FD969&ID=F1ABD670358E036C31296E66B3B66C382AC00812

इंग्रजीमध्ये जाणून घेण्यासाठी:
https://ntaneet.nic.in/ntaneet/ShowPdf.aspx?Type=50C9E8D5FC98727B4BBC93CF5D64A68DB647F04F&ID=F6E1126CEDEBF23E1463AEE73F9DF08783640400


Share:

इ.१०वी कलमापन व अधिक्षमता चाचणी २०१९-२०

महाराष्ट्र राज्यातील इ.१०वीच्या विद्यार्थ्यांची कलमापन व अधिक्षमता चाचणी दि. २७ डिसेंबर २०१९ ते १८ जानेवारी २०२० या कालावधीमध्ये घेण्यात येईल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://mahahsscboard.in/hsc_online/notification/KALMAPAN2020.pdf

Share:

Sunday, November 3, 2019

इ. १०वी सेमी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीची "सुपर टेस्ट सिरीज" दणक्यात सुरु

              "शालांत विभागीय परीक्षा - २०१९" मध्ये उत्तुंग भरारी घेणेकरीता इ. १०वी सेमी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक वर्ष २०१९-२० यावर्षी सुपर ३० सिंधू शैक्षणिक न्यास सिंधुदुर्ग या संस्थेंतर्गत सुपर ३० करिअर इंस्टीट्यूटच्यावतीने "सुपर सराव परीक्षा" हा कार्यक्रम राबविण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे रविवार दि. ३ नोव्हेंबर २०१९ पासून या कार्यक्रमाची दणक्यात सुरुवात झाली.
               सदर सराव परीक्षेला रविवार दि. ३ नोव्हेंबर २०१९ विज्ञान १ या पेपरला एकूण ७० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. उत्तरोत्तर काळात हा कार्यक्रम असाच यशस्वी होणेकरिता "सुपर ३०" कडून इतर सर्व इ. १०वीच्या पालक,शिक्षक व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते कि लवकरात लवकर आपली नोंदणी करून आपला निकाल योग्य लागणेकरिता आपण प्रयत्नशील रहावे.

अभ्यास, सराव आणि आत्मविश्वास हीच या परीक्षेतील यशाची त्रिसूत्री असल्याचे सुपर ३० चे संचालक श्री. सातोस्कर सर यांनी एका शिबिरात सांगितले.


नोंदणी करणेकरिता संपर्क:

अजय सर : ८८८८१२४५४२
प्रचीती मॅडम: ९१५८०८१९५०

Share:

Thursday, October 31, 2019

इ. १२वी विद्यार्थ्यांसाठीच्या रिव्हिजन कार्यक्रमाची धडाकेबाज सुरुवात

शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून होऊ घातलेल्या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची दि.३१ ऑक्टोबर पासून धडाकेबाज सुरुवात सुपर ३० कडून करण्यात आली.
ठरल्याप्रमाणे या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १५ विद्यार्थ्यांची हि टीम घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमात सुपर ३० चे श्री. अजय सर यांचे विशेष योगदान व सौ. प्रचीती यांचे विशेष प्रयत्न लाभलेत.
Share:

Thursday, October 17, 2019

इ.१०वी व १२वी फेब्रुवारी - मार्च २०२० परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ......

फेब्रुवारी - मार्च २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक (इ. १२वी) व माध्यमिक (इ. १०वी) परीक्षांच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.


सदर वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://www.mahahsscboard.in/

प्रकटन:
इ. १०वी वेळापत्रक इ. १२वी जनरल वेळापत्रक
इ. १२वी व्होकेशनल वेळापत्रक
Share:

Friday, August 23, 2019

स्पर्धात्मक परीक्षा 2020 वेळापत्रक - एन टी ए कडून जाहीर

एन टी ए या संस्थेने शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धात्मक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले.
सदर वेळापत्रक पाहण्यासाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता.
https://nta.ac.in/NoticeBoardArchive




Share:

Wednesday, May 22, 2019

IIT-JEE, NEET वर्गांची सुरुवात

दि. २० मे २०१९ या दिवसाचे औचित्य साधून इ. ११वी विज्ञान सोबत स्पर्धात्मक परीक्षा (IIT-JEE, NEET, NDA, NATA, etc) यांचे वर्ग सुरु करण्यात आले.

तत्पूर्वी दि. १९ मे २०१९ रोजी सदर प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी "स्वागत समारंभ व वार्षिक नियोजन" हा कार्यक्रम राबविण्यात आला. सदर कार्यक्रमास शैक्षणिक वर्ष २०१८-१९ रोजी विशेष प्राविण्य प्राप्त केलेले विद्यार्थी उपस्थित होते. सदर विद्यार्थ्यांनी स्वागतोत्सुक विद्यार्थ्यांस अभ्यास कसा करावा या विषयावर मार्गदर्शन केले. 
Share:

Monday, February 18, 2019

परीक्षा काळातील आहार

https://youtu.be/wXcAwUKzrTw

सौजन्य:
सुपर 30


Share:

Wednesday, February 6, 2019

Sunday, February 3, 2019

भुमिका, 10 वी परीक्षेला सामोरे जाताना, विद्यार्थी व पालकांची

भुमिका, 10वी परीक्षेला सामोरे जाताना, विद्यार्थी व पालकांची

आज दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी पार पडलेल्या कार्यक्रमास आपल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल

पुन:च्छ एकदा सर्व विद्यार्थी व पालकांचे आभार
Share:

Followers

"Nothing happens until something moves"

"Nothing happens until something moves"
PHYSICS

"Concern with natural world and humanities"

"Concern with natural world and humanities"
BIOLOGY

"Multiplies your opportunities"

"Multiplies your opportunities"
MATHS

"Dedicated to results"

"Dedicated to results"
CHEMISTRY

Blog Archive

Pages

Super 30

My photo
Sindhudurg, Maharashtra, India

Featured post

शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता इ. 11वी प्रवेश प्रक्रीया सुरु

 सर्व विद्यार्थी तथा पालक यांस संबोधित करण्यात येते की इ. 11वी प्रवेश प्रक्रीया शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षाकरीता सुरु झाली असून, सदर प्रव...

Search This Blog

Popular Posts